। कर्जत । वार्ताहर ।
कर्जत तालुक्यात वारे येथे होळीच्या सणाच्या निमित्ताने वारे प्रमियर लिंग आयोजित करण्यात आली होती. आठव्या वर्षी आयोजित वारे प्रीमियर लीगचे विजेतेपद अद्विक इलेव्हन संघाने जिंकले क्रिडा क्षेत्रामध्ये युवकांना संधी निर्माण करून देण्यासाठी वारे गावचे तत्कालीन उपसरपंच स्वर्गीय प्रवीण म्हसे यांनी वारे प्रिमियर लीग या नावाने हि स्पर्धा आठ वर्षापूर्वी सुरू करण्यात आली होती.यंदाच्या या स्पर्धामध्ये अद्विक इलेव्हन हा संघ प्रथम क्रमांक मिळवत वारे प्रिमियर लीग चषकाचे मानकरी ठरले. वारे प्रिमियर लिगचे उद्घाटन शेतकरी कामगार पक्षाचे जेष्ठ नेते, पक्षाचे जिल्हा खजिनदार श्रीराम राणे यांनी केले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य नारायण डामसे, ग्रामपंचायत सरपंच योगेश राणे, उपसरपंच निलेश म्हसे, दत्तात्रेय घोलप, मनोहर म्हसे, रघुनाथ म्हसे ,माजी सरपंच बबन भालेराव सामजिक कार्यकर्ते सुनील म्हसे, भानुदास भोईर, दीनानाथ म्हसे, सुनील जाधव, शिवाजी देशमुख तसेच मोठ्या संख्येने क्रिकेट प्रेमी उपस्थित होते.
दरवर्षीप्रमाणे होळीच्या उत्सवानिमित्त ग्रामपंचायत वारे नवतरुण मंडळ वारे यांच्या सहकार्याने क्रिकेटचे सामने आयोजीत करण्यात येतात. यंदाच्या वारे प्रिमियर लीगचे आठवे पर्व असून वारे येथील तृप्तश्वर मंदिराच्या प्रांगणात ग्रामीण भागातील 16 संघाने एकूण 176 खेळाडूंनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये चार संघ बक्षिस पात्र ठरले आहेत. स्पर्धेत विजेते संघ प्रथम क्रमांक अद्विक इलेव्हन विजेता ठरला तर उपविजेता पाटील बॉईज, तसेच तृतीय क्रमांकावर वेदीका इलेव्हन आणि चतुर्थ क्रमांक ओमकार इलेव्हन हे चार संघ बक्षिसपात्र ठरले.