कृषक कल्याणकारी संस्थेचा पुढाकार
| चौल | प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक अशा विविध उपक्रमांत नेहमीच अग्रेसर असणार्या कृषक कल्याणकारी संस्था चौल व आरसीएफ कंपनी, थळ यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, दि. 4 व रविवार, दि. 5 मार्च रोजी कृषी प्रदर्शन व कृषी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. शेतकर्यांना एकाच छताखाली शेतीविषयक नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती जाणून घेण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. हे प्रदर्शन मुख्य (मुखरी) गणपती मंदिर, चौल येथे सकाळी 10 ते सायं. 5 दरम्यान हे प्रदर्शन होणार आहे.
दरम्यान, या कृषी प्रदर्शात शेतकर्यांना आपल्या शेतात उत्पादित केलेली फुले, फळे व भाजीपाला आदी वस्तू ठेवता येणार आहेत. उत्कृष्ट शेतकर्यास यावेळी मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात येणार आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष रवींद्र पाटील यांनी दिली. तसेच महिलांसाठी पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धकांना फक्त शाकाहारी पदार्थच ठेवता येणार आहेत. या प्रदर्शनादरम्यान शनिवारी सकाळी दहा वाजता एच.बी. गुरसाळे यांचे ‘एकात्मिक कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन’, 10.30 वाजता कृषी यांचे ‘शासनाच्या कृषी योजना’, 11 वाजता डॉ. विवेक वर्तक यांचे ‘मत्स्यपालन आणि मत्स्यप्रक्रिया व्यवसायातील संधी’, 12 वाजता डॉ. नामदेव म्हसकर यांचे ‘कंदपीक उत्पादन तंत्रज्ञान’ या विषयावर महत्त्वपूर्ण मार्गदर्शन लाभणार आहे.
कृषी प्रदर्शनाबाबत अधिक माहितीसाठी विनायक थळकर 9273897964, शैलेश राईलकर 8010371773, विराज कीर 7057596685, विजय टेकाळकर 9225710332, वसंत घरत 9422352463, नाईक 9604249066, नितीन ठाकूर 9421158934, प्रमिता पाटील 9404656737, अल्पेश म्हात्रे 9922865621, जनार्दन नाईक यांच्याशी संपर्क साधावा. संस्थेचे अध्यक्ष रवींद्र नाईक, उपाध्यक्ष दिलीप पाटील, सुधाकर राऊळ, सचिव प्रकाश पाटील, खजिनदार प्रमोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे.