। अलिबाग । भारत रांजणकर ।
सध्या समुद्रात बोटीने मासेमारी करण्यास बंदी असून उदरनिर्वाहासाठी कोळी बांधव जाळीने मासे पकडतात. अलिबाग समुद्र किनार्यावर आज सोमवारी (दि.20) सकाळी कोळी बांधवांना तब्बल शंभर किलो वजनाचा पाकट मासा सापडला आहे.
खोल पाण्यातील मासेमारी बंद असताना पाकट मासा सापडल्याने दिलासा मिळाला आहे. वाघ्या पाकट नावाचा हा मासा आहे. दिनेश रामचंद्र नाखवा उर्फ नऊ व दिपीकेश दिनेश नाखवा (रा.अलिबाग, बंदरपाडा) या बाप-लेकाला अलिबाग कुलाबा किल्ल्याच्या मागच्या भागात खडपात मासेमारी करत असताना हा मासा सापडला. त्याचे वजन 100 किलो इतके असून 15 हजार रुपये एवढी त्याला किंमत येवू शकते. हा मासा मुंबईतील व्यापार्यांना विकण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.