अलिबाग राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांचा निषेध

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर संपकरी एसटी कर्मचार्‍यांनी हल्ला केला. राष्ट्रवादी काँग्रेस अलिबाग तालुका कमिटी तर्फे एसटी कर्मचार्‍यांचे वकील अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या प्रतिमेला शाई फासून निषेध करण्यात आला.

अलिबाग तहसीलदार यांना निषेधाचे पत्र देण्यात आले. या वेळी अलिबाग तालुकाध्यक्ष दत्ता ढवळे, युवक अध्यक्ष मनोज शिर्के, जिल्हा संघटक ऋषीकांत भगत, उपाध्यक्ष शैलेश चव्हाण, हेमनाथ खंडसबळे, मिनाक्षी खंरसबळे, लवेश नाईक, नौशाद पटेल, अरमान शेख, प्रविण रनवरे, संजोग पालकर, सचिन पाटील, रवि पाटील, मोहन कांबळे, नीलेश नागे, राज ढवळे, हर्ष ढवळे आदी उपस्थित होते.

Exit mobile version