| अलिबाग | प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील नवेनगर परिसरात बेकायदेशीररित्या राहणाऱ्या बांग्लादेशी महिलेला बांग्लादेशी विरोधी पथकाने रविवारी सायंकाळी अटक केली. तिच्याविरोधात पोयनाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नवेनगर परिसरात गणेश मंदिराजवळ असलेल्या एका चाळीमध्ये बांग्लादेशी महिला बेकायदेशीररित्या राहत असल्याची माहिती बांग्लादेशी विरोधी पथकाला मिळाली. रविवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास या पथकाने छापा टाकला. महिलेची चौकशी केली असता, वैध प्रवासी कागपत्र पासपोर्ट, व्हिसा, भारत सरकारने अथवा भारतीय सीमेवरील नोंदणी अधिकाऱ्याने नेमुण दिलेल्या मार्गा व्यतिरीक्त भारत बांगलादेश सीमेवरून चोरटया मार्गाने घुसखोरी करून भारतात प्रवेश करून मागील 15वर्षापासुन भारतामध्ये बनावट अधारकार्ड बनवुन अनधिकृतपणे वास्तव करीत असल्याचे उघड झाले. त्या महिलेला ताब्यात घेऊन तिच्याविरेोधात पोयनाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिला अलिबाग येथील न्यायालयात हजर करण्यात आहे.