। पाली/बेणसे । वार्ताहर ।
पालीतील विनायक माघ महोत्सवात राज्य आणि देशभरातून लाखो भाविक दाखल झाले होते. त्यावेळी, बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना अष्टविनायकांच्या अप्रतिम व सुरेख रांगोळीने आकर्षित केले होते. पालीतील अर्चना शेडगे हिने अष्टविनायक मधील 8 गणपतींची ही सुबक अशी रांगोळी विविध प्रकारच्या रंगांचा वापर करून मंदिराच्या बाहेर काढली होती. ही रंगोळी काढायला तिला तब्बल 12 तास लागले होते. दर वर्षी रांगोळीतील काही नवीन नवीन प्रयोग अर्चना करीत असते. दरम्यान, तिने काढलेल्या रांगोळीचे भाविकांकडून विशेष कौतुक करण्यात आले. तसेच, बल्लाळ नगरीत आलेला प्रत्येक भाविकांनी रांगोळीचे चित्रीकरण व सेल्फी काढले.