| पनवेल | वार्ताहर |
पनवेल शहरातील विनायक ज्वेलर्स या दुकानात आलेल्या एका बुरखाधारी अज्ञात महिलेने हातचलाखीने सोन्याच्या दागिन्यांची चोरी केल्याची घटना घडली आहे. सदर महिला या दुनाकात येऊन तिने सोन्याच्या कडा दाखवण्यास सांगून नंतर हातचलाखीने जवळपास 2 लाख रुपये किमतीचा सोन्याचा कडा हा तिच्या कडील बाजूस हाताच्या बोटाने ढकलून तो बुरख्यावरती पडल्यावर तो बुरख्याच्या खिशामध्ये घालून ती निघून गेली आहे. याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.