| मुंबई | प्रतिनिधी |
मालाडच्या शालीमार हॉटेलमधील एका खोलीत मन्सुरी याचा मृतदेह आढळळा होता. त्याचा मृतदेह पलंगावर अर्धनग्न अवस्थेत पडलेला होता. मिरा रोड मध्ये राहणाऱ्या मन्सुरी (47) यांचा मालाड येथे व्यवसास आहे. रविवारी (दि.04) रोजी संध्याकाळी त्याच्या पत्नीला एक मेसेज आला होता. हा मेसेज मन्सुरीच्याच मोबाईलवरून आला होता. मी आत्महत्या करत असून, त्याला माझी पत्नी जबाबदार आहे.’ असे या मेसेजमध्ये लिहिलेले होते. हा मेसेज पाहून मन्सुरी यांचा मुलाने त्वरीत नया नगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी त्यांच्या मोबाईल लोकेशनवरून त्याचा पत्ता शोधला. मन्सुरी याने आत्महत्येपूर्वी पाठवलेला मेसेज इंग्रजीत होता. एरवी तो कधीही इंग्रजीत मेसेज करत नसे. त्यामुळे पोलिसांना संशय आला होता. त्याचा मृतदेह शवविच्छेदनानासाठी पाठविण्यात आला होता. शवविच्छेदन अहवालात मन्सुरी याचा मृत्यू गळा दाबून झाल्याचे स्पष्ट झाले.
दिंडोशी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बरकत राठोड या महिलेचे मन्सुरी सोबत प्रेमसंबंध होते. दोघे एकमेकांचे नातेवाईक होते. दोन वर्षांपूर्वी बरकतच्या पतीला या दोघांच्या अनैतिक संबंधाबाबत माहिती मिळाली होती. त्यामुळे तिच्या पतीने तिला सोडून दिले होते. परंतु, बरकत आणि मन्सुरी यांचे प्रेमसंबंध सुरूच होते. दरम्यान दोघांमध्ये वाद सुरू झाला आणि तिने मन्सुरीचा काटा काढण्याचे ठरवले. ती शनिवारी रात्री राजस्थानवरून मन्सुरीला भेटायला मुंबईत आली. शनिवारची रात्र दोघांनी मालाडच्या शालीमार हॉटेलमध्ये काढली. रविवारी तिने मन्सुरीचा गळा दाबून हत्या केली. यानंतर मन्सुरीच्याच मोबाईलमधून त्याच्या पत्नीला मेसेज पाठवून आत्महत्या करत असल्याचे भासवले. मात्र, तिने मेसेज इंग्रजीतून पाठवल्यामुळे पोलिसांना सशंय आला आणि बरकत पोलिसांच्या रडारवर आली. तिने हत्या का केली याचा आम्ही तपास करत आहोत अशी माहिती दिंडोशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय आफळे यांनी दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक ओम तोटवार आणि त्यांच्या पथकाने या हत्येचा छडा लावला.