श्री सद्गुरू पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा

| रेवदंडा । वार्ताहर ।
चौलच्या श्री सद्गुरू ग्रामीण बिगरशेती सह. पतसंस्थेची 26 व्या वार्षिक सर्वसाधारण सभा पंतसंस्थेच्या सभागृहात गुरूवार (दि. 22) रोजी घेण्यात आली. यावेळी जेष्ठ सभासद व गुणवंत विदयार्थी सत्कार ठेवण्यात आला होता. सर्वसाधारण सभा पतसंस्थेचे अध्यक्ष प्रविण राऊत यांचे अध्यक्षतेखाली घेण्यात आली, यावेळी सुधाकर म्हात्रे, असिफ किरकिरे, प्रतिक्षा राऊत, प्रथमेश राऊत, शुभांगी पाटील, विश्‍वनाथ म्हात्रे, हरिश्‍चंद्र टेकाळकर, ज्योती म्हात्रे, प्रविण बाजी, अ‍ॅड. महेश म्हात्रे, आदी मंडळीची उपस्थिती होती.

यावेळी सहकार क्षेत्र पुणे येथील प्राध्यापक एस.बी. वटाणे यांचे मार्गदर्शन करताना सहकारी सभासद, शिक्षण, 97 वी दुरूस्ती, सभासदाचे हक्क, कर्त्यव्य याबाबत माहिती देऊन नियामक मंडळ, भागधारक,समता सभा ही सभासदाची असते तसेच सभासदाना स्वतचे मत मांडण्याचा अधिकार प्राप्त होतो असे सांगून सर्वसाधारण सभेस उपस्थिती बंधनकारक असल्याचे म्हटले. उपस्थितांचे आभार सुधाकर म्हात्रे यांनी व्यक्त केले. या पतसंस्थेचे वार्षिक सर्वसारण सभा यशस्वी होण्यासाठी पतसंस्थेचे व्यवस्थापक महेंद्र म्हात्रे व उपव्यवस्थापक निलेश राऊत तसेच पंतसस्थेचे कर्मचारीवर्ग यांनी विशेष परिश्रम घेतले.

Exit mobile version