आर्या भोपीने पटकाविले सुवर्ण पदक

। उरण । वार्ताहर ।
जम्प रोप सब ज्युनिअर, ज्युनिअर-सिनिअर स्टेट चॅम्पियनशीप 2022 स्पर्धेत पनवेल तालुक्यातील आर्या भारत भोपी हिने जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत या स्पर्धेत सुवर्णं पदक मिळविले आहे. भारतीय जम्प रोप महासंघ, जम्प रोप असोसिएशन महाराष्ट्र, नंदुरबार जिल्हा जम्प रोप अमैनेच्यूअर असोसिएशन, बिरसा मुंडा स्पोर्टस अकॅडमी, सोरापाडा आणि राष्ट्रीय छात्र सेना विभाग, कला वाणिज आणि विज्ञान महाविद्यालय तळोजा यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. आर्याला निलेश भोसले, अनुज भोसले यांचे मार्गदर्शन लाभले

Exit mobile version