पाली मार्गावरील डांबरीकरण निकृष्ट दर्जाचे

ठेकेदारावर कारवाई करा; भाजपची मागणी
। पाताळगंगा । वार्ताहर ।
पालीफाटा (खोपोली) मार्गे पाली रस्त्याच्या नूतनीकरणाचे काम एम.एस.आर.डी.सी च्या माध्यमातून गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे. काही किलोमीटरचे काम पूर्णत्वास गेले असून, काही ठिकाणचे काम काही कारणास्तव रखडले असल्याचे पाहायला मिळत आहे. परंतु, रखडलेल्या ठिकाणी पावसाळ्यापूर्वी डांबरीकरण करुन रस्ता दुरुस्ती करण्यात आला असता ते काम निकृष्ट दर्जाचे असून, डांबर उखडून पुन्हा खड्डे पडल्याने हे खड्डे अपघाताला कारणीभूत ठरत आहे. तरी दर्जाहीन काम करणार्‍या ठेकेदारावर कारवाई करावी, अशी मागणी भाजपाचे जिल्हा कोषाध्यक्ष सनी यादव यांनी केली आहे.

दरम्यान, पावसाळ्यात या मार्गावरील प्रवास सुखकर व्हावा यासाठी प्रशासनाने पुढाकार घेऊन नूतनीकरणाचे काम रखडलेल्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपाची दुरुस्ती करीत डांबरीकरण करण्यात आले. परंतु हे काम निकृष्ट दर्जाचे केल्याचे पहिल्याच पावसात समोर आले आहे. कारण, मार्गावर अनेक ठिकाणी पुन्हा खड्डे पडले असून, ते अपघाताला कारणीभूत ठरत आहेत. त्यामुळे ठेकेदाराबाबत नाराजी व्यक्त होत असून, त्याच्यावर कडक कारवाई व्हावी, अशी मागणी सनी यादव यांनी केली आहे. तशी तक्रार यादव यांनी एमएसआरडीसीच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनकडे केली आहे.

या रस्त्याचे अनेक ठिकाणी डांबरीकरणाचे काम करण्यात आले आहे, परंतु हे काम निकृष्ट दर्जाचे केलेल प्रथमदर्शनी सिद्ध होत आहे. तरी संबंधित विभागाने या ठेकेदारावर कारवाई करावी आणि त्याच पेमेंट थांबवावे. तसेच ठेकेदारावर कारवाई न केल्यास भाजपच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.जप

– सनी यादव, कोषाध्यक्ष, भा
Exit mobile version