जैन उद्योग समुह दिवाळखोरीत काढण्याचा प्रयत्न अयशस्वी

अध्यक्ष अशोक जैन यांचा दावा
। जळगाव । दिलीप जाधव ।
तब्बल 11 हजार कोटी रुपयांचा 12 हजार कामगार काम करणार्‍या सुप्रसिद्ध जैन उद्योग समूह दिवाळखोरीत काढून फक्त 1 हजार कोटी रुपयांना गिळकृत करण्याचा भारतातील दोन मोठ्या कंपन्याचा डाव होता. मात्र आम्ही तो यशस्वी होऊ दिला नाही, असा दावा समूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांनी केला.

समूह वाचविण्याचे आम्ही प्रयत्न केले त्यात ज्येष्ठ नेते शरद पवार,केंद्रीय मंत्री पियूष गोयल,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोलाची साथ मिळाली अशी प्रांजळ कबुली जैन यांनी प्रकल्पाला भेट देणार्‍या मंत्रालयातल्या पत्रकारांसमोर दिली.समुहावर 6400 कोटींचे कर्ज झाले होते. याचे पुनर्गठन करण्यात आले.ते करताना वाजवी व्याजदर लावा अशी आमची मागणी होती.तरीही आम्ही व्याजा पोटी तब्बल 6500कोटी भरल.आमच्या समूहात 35 हजार भागधारक आहेत. तर 70 टक्के वित्तीय संस्था ची भागीदारी आहे.

आता समुहावर 3800 कोटी रुपयांचे कर्ज राहिले आहे. त्याची परतफेड येत्या 3 वर्षात केली जाईल असा विश्‍वास व्यक्त केला.निसगार्र्च्या लहरीपणाचा फटका शेतकर्‍यांना बसतो. आर्थिक भार सहन न झाल्यामुळे साहजिकच तो आत्महत्येचा पर्याय निवडतो. या आत्महत्या रोखण्यासाठी कोरडवाहू शेतकर्यांनी पीक पद्धत बदलने गरजेचे असल्याचे मतही जैन यानी व्यक्त केले. फळाची लागवड करताना दोन झाडामध्ये कमीत कमी अंतर आणि झाडाला पाणी देताना ठीबक सिंचनाचा वापर केला पाहिज. नुसते झाड पाण्यात डुबवुन ठेवता कामा नये. त्या करीता शेतकर्यांना कृषी विभागाकडून विशेष प्रशिक्षण देण्याची आवश्यकता आहे. शेवटी निसर्गाच्या समोर सगळेच हतबल आहोत. अशा भावना अशोक जैन यांनी व्यक्त केल्या.

Exit mobile version