। न्यूझीलंड । वृत्तसंस्था ।
ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजचा पराभव करत वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. हा सामना पूर्णपणे एकतर्फी झाला असून वेस्टइंडिला 157 धावांनी पराभूत केले. वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकत ऑस्ट्रेलियाला फलंदाजीचे आमंत्रण दिले. मात्र हा निर्णय चुकला. ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदा फलंदाजी करताना 3 गडी गमवून 305 धाव केल्या. या धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचा संघ 148 धावांवर सर्वबाद झाला. ऑस्ट्रेलियाने 1978, 1982, 1988, 1997, 2005 आणि 2013 मध्ये विजेतेपद पटकावले आहे. नवव्यांदा ऑस्ट्रेलियन संघ अंतिम फेरीत पोहोचला आहे. अंतिम फेरीतपर्यंतच्या प्रवासात ऑस्ट्रेलियाने एकही सामना गमावलेला नाही.
रेशल हेनस आणि अलिसा हीली या जोडीनं ऑस्ट्रेलियाला दमदार सुरुवात करून दिली. पहिल्या गड्यासाठी दोघांनी 216 धावांची भागीदारी केली. हिली 127 धावा करून बाद झाली. त्यानंतर लगेचच रेशल हेनस 85 धावांवर असताना तंबूत परतली. चिनले हेन्रीच्या गोलंदाजीवर डिएन्ड्रा डोट्टीने झेल घेतला. तर एखले गार्डनर 12 धावांवर असताना बाद झाली. मात्र त्यानंतर मेग लन्निंग आणि बेथ मूने या जोडीनं संघाच्या 300 च्या पार धावा नेल्या आणि वेस्ट इंडिजसमोर 305 धावांचं आव्हान ठेवले होते.
306 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या वेस्ट इंडिजची सुरूवात खराब झाली. 12 धावांवर वेस्ट इंडिजची पहिली विकेट पडली. यातून विंडीजचा संध शेवटपर्यंत सावरू शकला नाही आणि संपूर्ण संघ 37 षटकांमध्ये 148 धावांमध्ये गारद झाला. कर्णधार स्टेफनी टेलर हिने सर्वाधिक 48 धावा केल्या, मात्र इतर फलंदाजांनी हाराकिरी केल्याने विंडीजला पराभव स्विकारावरा लागला. विंडीजचे 6 खेळाडू दुहेरी धावसंख्याही गाठू शकले नाहीत. ऑस्ट्रेलियाकडून जेस जोनासने हिने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या.