एचआयव्हीबाधितांची संख्या घटली
| पनवेल | प्रतिनिधी |
एचआईव्ही रोखण्यासाठी जिल्ह्यातील यंत्रणा करत असलेल्या कार्याला यश आले आहे. जिल्ह्यात गेल्या 10 वर्षांपूर्वी करण्यात आलेल्या एचआव्ही बाधितांची संख्या 436 इतकी होती. आता ही संख्या 116 वर आली आहे. जिल्हा एड्स नियंत्रण विभागाच्यावतीने नागरिकांमध्ये करण्यात येत असलेल्या जनजागृतीमुळेच ही संख्या घटल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
जिल्हा एड्स नियंत्रण विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, विभागाच्यावतीने 2014-15 या वर्षात करण्यात आलेल्या तपासणीत जिल्ह्यात 436 जणांना एचआयव्ही संसर्ग झाल्याचे समोर आले होते. आता ही संख्या घटली असून, एप्रिल ते ऑगस्ट या सहा महिन्यांच्या कालावधीत करण्यात आलेल्या तपासणीत ही संख्या 116 वर आली आहे. मागील वर्षी म्हणजेच एप्रिल 2024 ते मार्च 2025 या वर्षात हीच संख्या 343 इतकी होती. एप्रिल 2025 ते ऑगस्ट 2025 या सहा महिन्याच्या कालावधीत जिल्ह्यातील जवळपास 47 हजार 281 इतक्या रुग्णांची एचआयव्ही समुपदेशन व तपासणी करण्यात आली. यामध्ये 114 जण एचआयव्ही संसर्गित असल्याचे आढळून आले आहे. याच कालावधीत 23 हजार 612 गरोदर महिलांची एचआयव्ही समुपदेशन व चाचणी करण्यात आली. त्यामध्ये 2 गरोदर माता एचआयव्ही संसर्गित आढळून आल्या. तर, 13 बालकांची 18 महिन्यांनंतर करण्यात आलेल्या तपासणीत करण्यात आली. यात एकाही बालकाला एचआयव्हीचा संसर्ग झाला नसल्याचे स्पष्ट झाले.
जिल्हास्तरावर कार्यरत असलेल्या तीन एआरटी केंद्रासह 11 एआरटी केंद्रांमध्ये आतापर्यंत झालेल्या प्री एआरटी नोंदणीपैकी 8 हजार 321 लोकांना एआरटी उपचार चालू करण्यात आले आहेत. त्यापैकी 4 हजार 424 लोक रायगड जिल्ह्यामध्ये एआरटी उपचार घेत आहेत. नियमित उपचार घेत असलेल्या व आवश्यकता असलेल्या रुग्णाची दर सहा महिन्यांतून एकदा तसेच आवश्यकतेनुसार वर्षातून एकदा सीडी 4 काऊंट तपासणी केली जाते. एकही व्यक्ती उपचारापासून वंचित राहणार नाही, याकरता जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभागामार्फत विशेष लक्ष दिले जाते. ही सुविधा पूर्णपणे मोफत दिली जाते.
रायगड एचआयव्ही बाधित रुग्णसंख्या
| वर्ष | सर्वसाधारण | गरोदर महिला | एकूण |
| 2014-15 | 417 | 19 | 436 |
| 2015-16 | 374 | 23 | 397 |
| 2016-17 | 437 | 24 | 461 |
| 2017-18 | 460 | 16 | 476 |
| 2018-19 | 397 | 13 | 410 |
| 2019-20 | 361 | 17 | 378 |
| 2020-21 | 238 | 14 | 252 |
| 2021-22 | 257 | 13 | 270 |
| 2022-23 | 344 | 16 | 360 |
| 2023-24 | 323 | 15 | 338 |
| 2024-25 | 326 | 17 | 343 |
| एप्रिल ते ऑगस्ट | 114 | 02 | 116 |
एड्सबद्दल जनजागृतीसाठी प्रशासन करत असलेल्या प्रयत्नांमुळेच रुग्ण संख्येत मोठी घट होत आहे. या करता गावे, शाळा, कॉलेज या ठिकाणी प्रबोधनपर कार्यक्रम घेतले जात आहेत. शिवाय, चाचण्यांची संख्या वाढवण्यात आली असून आता चांगले औषधोपचार उपलब्ध झाले आहेत.
संजय माने,
जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक







