बाबुराव कुलाबकर यांचे निधन

| मुरूड जंजिरा | वार्ताहर |

मुरूड येथील नवापाडा महादेव कोळी समाजाचे जयेष्ठ पंच आणि येथील सागरकन्या मच्छिमार सहकारी सोसायटीचे संचालक बाबुराव हाशा कुलाबकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने आकस्मिक निधन झाले. ते 72 वर्षांचे होते. गेली 25 वर्षे ते कोळी समाजाचे सक्रिय पंच म्हणून यशस्वीपणे कार्यरत होते. मुरूड येथील सागरकन्या मच्छिमार सहकारी सोसायटीचे ते तब्बल 20 वर्षे संचालक होते. त्यांच्या पश्‍चात दोन पुत्र, दोन कन्या आणि मोठा आप्त परिवार आहे. कै. कुलाबकर यांचा दशक्रिया विधी शनिवारी (दि.19) मुरूड येथे होणार आहे.

Exit mobile version