आदर्शवादी राजकारणाचा दीपस्तंभ -माजी आमदार धैर्यशील पाटील

माजी आमदार धैर्यशील पाटील

राजकारण हे लबाडांचे क्षेत्र आहे असे अनेकांचे मत आहे.परंतु या समाजाला छेद देणारा ऋषीतूल्य व्यक्तीमत्व आज काळाच्या पडद्याआड गेले आहेत. आदर्शवादी राजकारणाचा जणू काही दीपस्तंभ निमाल्याची भावना मनात दाटून येत आहे. आबा म्हणजे साधी राहणी व उच्च विचारसरणी यामुळेच सलग 11 वेळा आमदार होण्याचे जे कार्य त्यांनी केले ते फक्त जनता जनार्दनाच्या सेवेमुळेच. मी माझे भाग्य समजतो की एवढया मोठया महान विभूतीच्या सोबत मला काम करण्याचे भाग्य लाभले.आजच्या नवीन तरुणाईला राजकारणात योग्य मार्ग दाखवण्याचे काम आबांनी केले आहे. दिपस्तंभ ज्या प्रमाणे अथांग समुद्रात योग्य दिशा दाखवण्याचे काम करतो त्याच प्रमाणे आबांचे कार्य आहे.

Exit mobile version