मारहाण करून लोखंडी पलंगाला बांधले

|पनवेल । वार्ताहर ।
54 वर्षीय इसमाला दगडाने मारहाण करून त्याला लोखंडी पलंगाला बांधून ठेवल्या प्रकरणी तीन अनोळखी ईसमा विरोधात पनवेल तालुका पोलीस ठाण्यात हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राम गोपाळ पाटील हे वाधवा वाईस सिटी, लेबर कॉलनी वारदोली येथे भाजी विक्री करण्यासाठी गेले असता त्यांना अज्ञात कारणावरून जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने लेबर कॉलनी मधील तीन अनोळखी इसमानी दगडाने डोक्यात मारहाण केली व खाली पाडून हातापायाने छातीवर व शरीरावर मारहाण करून डोक्यात गंभीर दुखापत व बरगड्यास फ्रॅक्चर केले. त्यानंतर राम पाटील यांना पत्र्याच्या शेडमधील रूम नंबर चार मध्ये लोखंडी पलंगाला बांधून ठेवले. यात राम गोपाळ पाटील हे जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पनवेल तालुका पोलीस अधिक तपास करत आहेत.

Exit mobile version