चिरनेरमध्ये बेटी बचाव, बेटी पडावचा नारा

। जेएनपीटी । वार्ताहर ।
शासनाच्या पोषण आहार अभियान अंतर्गत 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2021 पर्यंत बेटी बचाव बेटी पडावचा नारा चिरनेर ग्रामपंचायत हद्दीतील सात अंगणवाडीतील सेविकांनी गावागावात रॅलीचे आयोजन करुन दिला. याप्रसंगी कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सर्व अंगणवाडी सेविकांनी शासकीय नियमांचे काटेकोरपणे पालन केले होते. पोषण आहार अभियानाचे औचित्य साधून अंगणवाडी सेविकांनी चिरनेर गावातील महिलांना पोषण आहाराचे विशेष महत्त्व पटवून दिले. तसेच कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर मास्कचा वापर करा, आपले हात स्वच्छ धुवावेत, डॉक्टरांच्या सल्ल्याने आजारांवर उपचार करून घ्यावेत अशा प्रकारच्या सुचना रहिवाशांना देण्यात आल्या. सदर पोषण आहार अभियानात वर्षा ठाकूर, पुष्पा मोकल, सुगंधा कडू, वैजयंती म्हात्रे, रोहिणी ठाकूर, कविता ठाकूर, पद्मावती मोकल, मंदाकिनी नारंगीकर, रंजना मोकल, दमयंती ठाकूर तसेच प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

Exit mobile version