चित्रलेखा पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन

| अलिबाग | प्रतिनिधी |

ग्रुप ग्रामपंचायत सुडकोली हद्दीतील कुदे येथे तक्षशिला बुध्द विहारचा भूमिपूजन सोहळा मंगळवार (दि. 27) शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांच्या हस्ते पार पडला.

यावेळी सुडकोली ग्रामपंचायत सरपंच प्रीती जयवंत तांबडकर, उपसरपंच नारायण गोसावी, माजी सरपंच मोहन धुमाळ, जयवंत तांबडकर, रमेश धर्मा पाटील, नवनीत पाटील. मुंबई मंडळाचे अध्यक्ष मंगेश घाणेकर, पोलीस पाटील शशिकांत पाटील, अलिबाग तालुका पुरोगामी युवक संघटना अध्यक्ष विक्रांत वार्डे, कुरूळ ग्रामपंचायतचे सदस्य अवधूत पाटील, बोद्ध विकास सेवा मंडळ, गायकवाड बंधु कुदे, माता रमाई महिला मंडळ कुदे, अध्यक्ष सुनील कमलाकर गायकवाड, ज्योती गायकवाड आणि कार्यकारीणी तसेच सभासद वर्ग, इतर कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version