| खरोशी | वार्ताहर |
जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज संस्थान तर्फे रक्तदान महायज्ञ शिबीर 4 ते 19 जानेवारी दरम्यान महाराष्ट्रभर राबवली जात आहेत. महाराष्ट्रात सिकलसेल ॲनेमिया, हिमोफिलीया, चॅलेसेमिआ, ब्लड कॅन्सर, किडनी फेल्युअर पेशंट जास्त आढळतात. अशा रुग्णांना वारंवार रक्ताची नितांत आवश्यकता असते. यासाठी महाराष्ट्र शासनाच्या रक्तपेढ्यांना रक्तबाटल्या देण्याचे संप्रदायामार्फत निश्चित केले होते.
दरम्यान, पेण तालुका अंतर्गत पेण नगरपालिका येथे महारक्तदान शिबिराचे आयोजन रविवारी (दि.19) करण्यात आले होते. हे रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी पेण तालुक्यातील रक्तदात्यांनी उपस्थित राहून सहकार्य केले. तसेच, या रक्तदान शिबिरासाठी मानव संसाधन विकास संस्था रायगड जिल्हा यांनी मोलाचे सहकार्य केले. या रक्तदान शिबिरात वडखळ 146, गडब 100, पांडापुर 72, कामार्ली 122, वाशी 183, दादर 138, जिते 108, रावे 107, पेण शहर 439 अशा एकूण 1 हजार 416 कुपीका संकलित करण्यात आल्या. यावेळी, मुख्यपीठ प्रमुख आकाश पाटील, साहिल म्हात्रे, रवींद्र भोईर, पेण तालुका अध्यक्ष किरण म्हात्रे, समीर म्हात्रे, अनिकेत जोशी, प्रणित माळी, प्रतीक पाटील, आध्यात्मिक प्रमुख रविंद्र शिंदे जयवंत घरत, महिला अध्यक्ष कविता म्हात्रे, संजना पाटील, विशेष कार्यवाहक आहेर, देवीदास पाटील, अदिराज म्हात्रे, पुरोहित शिवम गुरुजी, सर्व सेवाकेंद्र कमिटी, संग्राम सेना, युवासेना, तालुका आजी- माजी पदाधिकारी व भक्तगण कार्यक्रमाला उपस्थित होते.