। पनवेल । वार्ताहर।
टाटा पॉवर लायटीच्या टॉवर जवळ एका इसमाचा मृतदेह आढळून आला असून सदर करंजाडे ते भिंगारी जाणार्या रस्त्यावर घडली आहे. या इसमाचे अंदाजे वय 40 ते 45 वर्षे, रंग सावळा, उंची 5 फूट 5 इंच, चेहरा उभट, अंगाने मध्यम, डोक्यावरील केस काळे व मध्यम वाढलेले असून अंगात पिवळ्या व राखाडी रंगाचे आडवे पट्टे असलेला हाफ बाह्याचा टीशर्ट व फिकट राखाडी रंगाची पॅन्ट घातलेली आहे. या इसमाबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास पनवेल शहर पोलीस ठाणे दूरध्वनी 022-27452333 किंवा सहा. पोलीस निरीक्षक शिवाजी हुलगे यांच्याशी संपर्क साधावा.