। मुंबई । प्रतिनिधी ।
भांडुपमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. भांडूपच्या एलबीएस मार्गावरील ड्रीम मॉलमध्ये एका महिलेचा मृतदेह आढळला आहे. पोलिसांनी हा मृतदेह बाहेर काढून तपासणीसाठी पाठवला आहे. महिलेचा मृत्यू नेमका कशामुळे झाला आहे? याचे कारण अद्याप समजू शकले नाही. मात्र, या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
भांडुप पश्चिम येथील एलबीएस मार्गावर असलेल्या ड्रीम मॉलमध्ये मंगळवारी (दि. 21) सकाळी नऊच्या सुमारास काही कर्मचारी या मॉलमधील तळघरात काही काम करत असताना त्यांना तेथे साचलेल्या पाण्यात एका महिलेचा मृतदेह दिसला. कर्मचार्यानी तात्काळ याबाबत माहिती पोलिसांना दिली असता भांडुप पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी पालिका रुग्णालयात पाठवला आहे. आद्यप तरी या मृतदेहाची ओळख पटली नसून भांडुप पोलीस अधिक तपास करत आहेत.