। पालघर । प्रतिनिधी ।
पालघर येथील एका बावीस वर्षीय तरुणीने घरफोडी करून पळून जाणार्या दोन चोरट्यांपैकी एका चोराला मोठ्या धाडसाने पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. या प्रकरणातील अन्य एक साथीदार सोन्याचे दागिने घेऊन पसार झाला आहे.
पालघरमधील आदर्श नगर येथील वसंत विहार या इमारतीत राहणारे चव्हाण कुटुंबीय सोमवारी सायंकाळी कामानिमित्त बाहेर गेले होते. सात वाजल्यानंतर घरात कोणी नसल्याचा अंदाज घेऊन दोन चोरटे कुलुप तोडून आत शिरले. घरातील दोन्ही कपाटातील सोन्याचे दागिने, रोख रक्कम चोरट्यांनी आपल्या जवळील बॅगमध्ये भरली. आठ वाजताच्यासुमारास 22 वर्षीय काजल व तिचे पती परत आले असता काजलला बाहेरच्या खोलीत पाठीवर बॅग घेऊन उभ्या असलेल्या चोराने आवाज न करण्याची धमकी दिली. ती आरडाओरडा करणार या वेळातच बाहेरच्या खोलीतील चोर तिला धक्का देऊन व तिच्या डाव्या हातावर लोखंडी अवजाराने मार देऊन पळून गेला. तेवढ्यात आतील खोलीमधे असलेला आरोपीला काजल हिने त्याला पकडण्यासाठी झटापट केली. त्याचा पाय घट्ट पकडून ठेवल्यामुळे त्याने तिला फरपटत दरवाजा बाहेरील लिफ्टपर्यंत घेऊन गेला. तेवढ्यात तिने आरडाओरडा केल्यामुळे इमारतीतील इतर रहिवासी व तिचा पती मदतीला धावून आले.