| कोल्हापूर | वृत्तसंस्था |
कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी गावात एका बड्या चांदी व्यावसायिकाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. ब्रम्हनाथ सुकुमार हालोंढे असे हत्या झालेल्या चांदी व्यावसायिकाचे नाव आहे. हत्या करून सुमारे 25 किलो चांदीची चोरी झाल्याचे उघड झाले असून या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत.
सविस्तर वृत्त असे की, ब्रम्हनाथ सुकुमार हालोंढे (29) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. हत्या करुन घरातील 25 किलो चांदीची चोरी झाल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे चोरीच्या उद्देशानेच ही भयंकर घटना घडली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आहे, तसेच याप्रकरणी एका संशयितासही अटक करण्यात आली असून गोकुळ शिरगांव पोलीस अधिक तपास करीत आहेत.