पनवेलमध्ये व्यवसाय मार्गदर्शन शिबीर

जे.एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्थेचा स्तुत्य उपक्रम
। पनवेल । प्रतिनिधी ।
पनवेलमध्ये प्रथमच पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांच्या संकल्पनेतून एका छत्राखाली व्यवसाय आणि अर्थसहाय्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये केंद्र सरकारचे विविध कोर्सेसची माहिती देण्यासाठी संबंधित विभागातील अधिकारी उपस्थित होते. दरम्यान, कोर्स पूर्ण झाल्यावर आवश्यक ते परवाने काढण्यासाठी नियोजन असल्याने कोर्स पूर्ण करून परवाने काढल्यानंतर स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारमार्फत ज्या विविध सबसीडी कर्जही मिळतील. ते मिळण्यासाठी योग्य मार्गदर्शन करण्यासाठी विविध नॅशनलाईज बँकांचे प्रतिनिधीसुद्धा उपस्थित होते. हे शिीर युवक, महिला आणि तृतीय पंथी अशा प्रत्येक स्तरातील नागरिकांसाठी मोफत आयोजित करण्यात आले होते.

शेतकरी कामगार पक्ष, जे.एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्था व लक्ष्यपूर्ती वेलफेअर फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने व्यवसाय व अर्थसहाय्य मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले होते. आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात मार्गदर्शन घेणार्‍या सदस्यांना व्यवसाय आणि अर्थसहाय्य मार्गदर्शक म्हणून खादी ग्रामोद्योग आयोगाचे नारायण कांबळे व राष्ट्रीय लघु उद्योग महामंडळाचे कांतायन जिन्हा, तसेच इंडियन चेंबर ऑफ इंटरनॅशनल बिझनेसचे केलविन मेहता, तंत्राज हेल्थ केअर ब्युटी वेलनेस संचालिका डॉ. पल्लवी शिंदे, नॅशनलाईज बँकेचे सल्लागार, रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सोनल पाटील आदी विविध क्षेत्रातील तज्ज्ञ मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मार्गदर्शन शिबीर पार पडले.

कार्यक्रम प्रसंगी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे उपस्थित होते. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या संचालिका ममता प्रीतम म्हात्रे, नगरसेविका डॉ. सुरेखा मोहोकर, नगरसेविका प्रीती जॉर्ज, ज्येष्ठ नगरसेवक शंकर म्हात्रे, युवा नगरसेवक रवींद्र भगत, लक्ष्यपूर्ती वेलफेअर फेडरेशनच्या अध्यक्ष मंजुषा परब, कर्नाळाचे संपादक हरेश मोकल व पत्रकार वर्गाच्या उपस्थिती अनेक लाभार्थ्यांनि हजेरी लावली.

Exit mobile version