। पनवेल । वार्ताहर ।
इनोव्हा कारचे टायर बदलत असताना पाठीमागून आलेला ग्रँड आय टेन नियोस कारने इनोव्हा कारला पाठीमागून धडक दिली. या अपघातात ईनोवा कारचे नुकसान झाले. याप्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात आय टेन कारचालक ऋतिक काशिनाथ भोईर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
अनिकेत विश्वजीत मोरे हे मुख्यालय कोल्हापूर येथे पोलीस शिपाई आहेत. ते पळस्पे ते जेएनपीटी रोड लेनने जात असताना नांदगावच्या जवळ आले. यावेळी त्यांची कार खड्ड्यांमध्ये आदळल्याने कारच्या डाव्या बाजूचे दोन्ही टायर फुटले. कार रस्त्याच्या कडेला उभी करून टायर बदलत असताना पाठीमागून आलेल्या ह्युंदाई कंपनीच्या ग्रँड आय टेन नीयोस गाडीवरील चालकाने त्याच्या ताब्यातील कार भरधाव वेगाने चालवली आणि रस्त्याच्या कडेला उभी असलेल्या इनोव्हा कारला मागच्या बाजूने धडक दिली. यात पोलीस शिपाई अनिकेत मोरे हे किरकोळ जखमी झाले. अपघातात दोन्ही कारचे नुकसान झाले. याप्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.