| नागपूर | प्रतिनिधी |
लग्नावरून नागपूरला परत येत असताना एका कार चालकाने उभ्या बसला मागून जोरदार धडक दिली. या घटनेत कार चालकाचा घटनास्थळावर मृत्यू झाला असून, एका चार वर्षाच्या चिमुकल्यासह तीन जण गंभीर झाल्याची घटना स्थानिक पोलिस स्टेशन हद्दीतील दहेगाव रंगारी रिलायंस पेट्रोल पंपाजवळ मंगळवारी (दि.15) मध्यरात्री घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत चालकाचे नाव सतीश कौरोती (32), इंदोरा, नागपूर असे आहे, तर जोत्सना शिरसाम (40), सुरेंद्र उईके (32), रजत शिरसाम(4), उषा उईके (62) अशी गंभीर जखमींची नावे आहेत. सतिशने कौरती हे सौंसर तालुक्यातील सवरनी जवळ असणाऱ्या बिदोनी गावात नातेवाईच्या घरी लग्नात जाण्यासाठी एका दिवसाकरीता मित्रांकडे कार मागितली होती. यादरम्यान 15 एप्रिलला मध्यरात्री रिलायंस पेट्रोलपंप दहेगाव रंगारी गावाजवळ इलेक्ट्रिकल बस रस्त्याच्या कडेला उभी होती. यावेळी सतिश व त्यांचे कुटुंब भिदोनीवरुन लग्न आटोपून नागपूरकडे घरी परत जात असतांना उभ्या बसला मागून जोरदार धडक दिली. या घटनेत सतिशचा घटनास्थळी मृत्यू झाला, तर चार वर्षाचा चिमुकला व दोन महिला व एक तरुण गंभीर जखमी झाले. सर्व जखमींना रुग्णालयात हलविण्यात आले. खापरखेडा पोलिसांनी घटनेचा पंचनामा करुन तक्रारदाराच्या तक्रारीवरून गुन्हा नोंद करण्यात आला असून, खापरखेडा पोलिस पुढील तपास सुरू आहे.