| चौल | प्रतिनिधी |
महाराष्ट्र शासन कृषी विभाग प्रकल्प संचालक (आत्मा) व कृषक कल्याणकारी संस्था चौल यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार, दि. 17 एप्रिल रोजी दुपारी 2 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत चौल थेरोंडा फाटा कोकण स्वाद हॉटेल येथील पाटील वाडीत मधुमक्षिकापालन प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात डॉ. तुकाराम निकम ‘मधमाशांची मैत्री-श्रीमंतीची खात्री’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. या मधुमक्षिकापालन प्रशिक्षण कार्यक्रमाचा लाभ सर्व शेतकरी बंधू-भगिनींनी, नारळ-सुपारी बागायतदार, युवक-युवतींनी घ्यावा, असे आवाहन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र पाटील यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी रवींद्र पाटील 8975932044, संस्थेचे अध्यक्ष प्रमोद पाटील 9158620215 या भ्रमणध्वनी क्रमांकांवर संपर्क साधावा.