| कोलाड | वार्ताहर |
रोहा-कोलाड मुख्य मार्गावर सोमवारी (दि.20) रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास संभे गावानजीक इर्टिगा गाडीने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकी स्वार गंभीर जखमी झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनील चंद्रकांत सावंत (54) रा. रोहा हे कोलाड बाजूकडून रोहा बाजूकडे जात असताना. इर्टीगा गाडी रोहा बाजूकडून कोलाड बाजूकडे जाणाऱ्या अब्दुल रहीम खान (25) दुचाकी यांना समोरासमोर धडक दिली. या अपघातात दुचाकी स्वार रस्त्यावर खाली पडल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली आहे. अपघाताची माहिती सागर दहिंबेकर यांच्या एसव्हीआरएसएस टीमला समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी दुचाकीस्वाराला पुढील उपचारासाठी भट नर्सिंग होम रोहा येथे दाखल केले. या घटनेचा पुढील तपास कोलाड पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार शिर्के करीत आहेत.