| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल शहर पोलिसांनी परिसरात विनापरवाना गॅस सिलिंडरच्या साहाय्याने इंडली-डोसा विक्री करणाऱ्या एका विक्रेत्यावर कारवाई करण्यात आली आहे. बाबुल साहू (28) असे विक्रेत्याचे नाव असून, त्याच्याविरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार करंजाडे परिसरात बाबुल साहू हा सार्वजनिक ठिकाणी गॅस सिलिंडरच्या साहाय्याने इडली-डोसा विक्री करताना आढळून आला. त्यामुळे मानवी जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी तत्काळ कारवाई केली. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रज्ञा मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल शहर पोलीस करीत आहेत.
इडली-डोसा विक्रेत्यावर गुन्हा
