#skprojgarmelava! परिवर्तनाच्या दृष्टीने ऐतिहासिक क्षण

। अलिबाग । प्रतिनिधी ।
ऐतिहासिक, जिव्हाळ्याच्या दृष्टीने युवक व युवतींसाठी महत्वाचा दिवस आहे. चित्रलेखा पाटील यांनी कमी कालावधीतच एक वेगळी छाप या उपक्रमाच्या माध्यमातून टाकली आहे. शेकापच्या माध्यमातून अनेक कार्यकर्ते घडले असून राज्य व दिल्लीच्या तख्त्यावर ते काम करतात.

ही पुरोगामी विचारधारा महाराष्ट्रात रुजविण्याचे काम शेकापने केले आहे. शेकापच्या चित्रलेखा पाटील यांनी आजच्या पिढीची गरज ओळखून रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून एक वेगळा उपक्रम हाती घेतला आहे. यातून दिशा देण्याचे काम चित्रलेखा पाटील यांनी केले आहे.

ज्या कंपन्यांचे प्रवेशद्वार उघडू शकत नाही. ज्या कंपन्यांच्या अधिकार्‍यांना भेटू शकत नाही. त्या कंपनीचे अधिकारी रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून आज युवक व युवतींपर्यंत पोहचले आहेत. अनेकांना रोजगार देण्यासाठी ही मंडळी आली आहे. या संधीचा फायदा प्रत्येकांनी घेऊन घडण्याचा प्रयत्न करावा. परिवर्तनाच्या दृष्टीने हा एक ऐतिहासिक क्षण आहे. काळाची गरज ओळखून चित्रलेखा पाटील यांनी बेरोजगारांसाठी रोजगाराचे दालन खुले केले आहे, असे गौरवोद्गार जिल्हा परिषदेचे माजी सदस्य द्वारकानाथ नाईक यांनी काढले.

Exit mobile version