पूर्ववैमनस्यातून हाणामारी; बापलेक जखमी

| रसायनी | वार्ताहर |
पूर्ववैमनस्यातून बापलेकाच्या डोक्यात लोखंडी सळईची उपट घालून गंभीर जखमी केल्याची घटना खालापूर तालुक्यातील खैराट येथे घडली आहे. खैराट गावत राहणारे केशव आखाडे यांचे गावातील काही व्यक्तीसोबत वाद झाले होते. त्या रागातून निलेश आखाडे, गणेश आखाडे, रवींद्र आखाडे, गोविंद भागा, शांताबाई निलेश आखाडे हे सर्व केशव यांच्या घरासमोर जमा झाले. निलेश याने केशवला फोन करून घराबाहेर बोलावून मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळेस सोबत असलेल्या इतरांनीदेखील मारहाण केली. निलेशने लोखंडी सळईची उपट केशवचे डोक्यात मारली. केशवला होत असलेली मारहाण पाहून त्याचे वडील दगडू मध्ये गेले असता रवींद्रने दगडू यांच्या डोक्यात लोखंडी सळईची उपट मारून दुखापत केली. तसेच शिविगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. केशव आखाडे याने दिलेल्या तक्रारीवरुन खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहायक पोलीस फौजदर मोहन बहाडकर हे करीत आहेत.

Exit mobile version