| तळा | वार्ताहर |
‘प्रोजेक्ट अमृत’ ‘अंतर्गत स्वच्छ जल, स्वच्छ मन’ परियोजनेच्या द्वितिय टप्प्याचा शुभारंभ यमुना नदीचा छठ घाट, आई.टी.ओ. दिल्ली येथून करण्यात आला. बाबा हरदेवसिंहजी महाराज यांच्या दिव्य शिकवणूकीच्या प्रेरणेतून साकारलेली ही परियोजना भारतवर्षातील सर्व राज्य व केंद्रशासित प्रदेशांतील 1 हजार 533 ठिकाणी एकाच वेळी राबविण्यात आली. ज्यामध्ये 11 लाखाहून अधिक स्वयंसेवकांनी भाग घेतला. संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनतर्फे प्रोजेक्ट अमृतचे देशभरात आयोजन करण्यात येत असून त्याचाच एक भाग म्हणून तळा तालुक्यातील मौजे चोरीवली येथे प्रोजेक्ट अमृत अंतर्गत स्वच्छ जल, स्वच्छ मन ही परियोजना चोरवली रा.जि.प शाळेजवळ राबविण्यात आली. ज्यामध्ये सार्वजनिक विहीर व नाला यांची स्वच्छता पूर्णपणे स्वच्छता करण्यात आली. या कार्यक्रमाप्रसंगी चोरवली ब्रांच मुखी गणेश राणे, ग्रामस्थ अध्यक्ष मधुकर अंबावले तसेच निरंकारी सेवादल अन्य निरंकारी भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.