कोएसो संस्कारक्षम पिढी घडविणारी संस्था

संचालक पंडित पाटील यांचे प्रशंसोद्गार
| पेझारी | वार्ताहर |
कोएसो ही संस्कारक्षम पिढी घडविणारी शिक्षण संस्था असल्याचे प्रशंसोद्गार ज्येष्ठ संचालक, माजी आम.पंडित पाटील यांनी रविवारी काढले. कोएसोच्या ना. ना. पाटील पोयनाड संकुलाच्या वर्धापनदिन सोहळ्याच्या अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते. आप्पासाहेब, अ‍ॅड. दत्ता पाटील, प्रभाकर पाटील यांनी ज्ञानगंगा खेडोपाडी पोहोचविली ती कोएसोच्या माध्यमातून! त्यांचा शैक्षणिक वारसा पुढे चालू ठेवण्याचे काम त्यांचे वारस म्हणू आम्ही सर्व मंडळी शिक्षणक्षेत्रात प्रामाणिकफणे काम करीत आहोत,असे ते म्हणाले.

संस्थेचा वर्धापनदिन उत्साहात साजरा झाला. पी.जी. भगत यांच्या हस्ते ध्वज फडकविण्यात आला. यावेळी सहमुख्यकार्यकारी अधिकारी अशोक गावडे, शाळा समिती सदस्य यशवंत पाटील, स्वप्निल पाटील, मॉर्निंग वॉक ग्रुपचे अध्यक्ष प्रकाश म्हात्रे, विकास पाटील, शिरीष पाटील, मोहन मंचुके, किशोर पाटील, सीके ठाकूर, डोंगरे, संकुलप्रमुख कमलाकर फडतरे, डॉ. दिलीप पाटील, ललिता पाटील, संतोष्वरी मठपती, संगीता माने तसेच संकुलातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि आजी-माजी विद्यार्थी उपस्थित होते.

कार्यक्रम प्रसंगी शाळेच्या कलापथकाने संगीतशिक्षक राजेंद्र म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रगीत, प्रतिज्ञा, गौरवगीत आणि घोषवाक्य सादर केली. यानंतर संकुल प्रमुख कमलाकर फडतरे यांनी शुभसंदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविला. को.ए. सो. दैदीप्यमान इतिहास अविनाश पाटील यांनी सांगितला. यावेळी शाळेतील नववी क मधील विद्यार्थिनी सई पाटील ,कशिश पाटील, आणि आर्या गायकवाड यांनी चित्रकला शिक्षक देवेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली को.ए.सो.वर्धापनदिन तयार केलेल्या भित्तिपत्रकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले .पुढे संकुलातील सर्व शाखांतील सर्वोत्कृष्ट विद्यार्थ्यांचा गुणगौरव मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आला. सदर प्रसंगी झालेल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सायली पाटील यांनी केले तर उपस्थितांचे आभार तुकाराम बर्गे यांनी मानले.

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी समाधान भंडारे, एस. के. पाटील, तृप्ती पिळवणकर, संध्या खरसंबळे, प्रसन्ना राठोड, राजेश स्वामी, अनिल पाटील, उदय पाटील, एनसीसी, आर एस पी, गाईड पथके तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. यानंतर वार्षिक स्नेहसंमेलनांतर्गत स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Exit mobile version