आरसीएफ कंपनीने जपली सामाजिक बांधिलकी
। अलिबाग । प्रतिनिधी ।
समुद्रातील मासळी खराब होऊ नये, ती सुस्थितीत राहवी यासाठी थळमधील आरसीएफ कंपनीने सामाजिक बांधिलकी जपत परिसरातील महिलांना शीतपेट्या दिल्या आहेत. कंपनीने सामाजिक बांधिलकी जपत दिलेल्या शितपेट्यांचा मासळी विक्रेत्या महिलांना आधार मिळाला आहे. मासळीचे उत्पादन ताजे आणि सुरक्षित ठेवण्यासाठी शीतपेट्या फायदेशीर ठरत असल्याचे यावेळी महिलांनी स्पष्ट केले आहे.
मच्छीमार जीवाची पर्वा करीत खोल समुद्रात मासेमारी करत असतात. परंतु, मासळी सुरक्षित ठेवण्यासाठी शीतपेट्यांचा अभाव कायमच आला आहे. त्यामुळे अनेकवेळा मासळी खराब झाल्याने मासळी विक्रेत्या महिलांचे मोठे आर्थिक नुकसान होते. ही समस्या सोडविण्यासाठी थळमधील आरसीएफ कंपनीने पुढाकार घेतला आहे. थळ मच्छीमार सहकारी सोसायटी लि. आणि नवेदर नवगाव बोरेश्वर सर्वोदय सहकारी सोसायटी लि. यांच्या मागणीनुसार, सुमारे 1 हजार मच्छीमार महिलांना मासळी व्यवसायासाठी शितपेट्यांची आवश्यकता होती. या मागणीनुसान आरसीएफ प्रशासनाने बांधिलकी मासळीचे उत्पादन ताजे आणि सुरक्षित ठेवण्यासाठी, उत्पादकता वाढवण्यासाठी आणि त्यांच्या जीवनशैलीमध्ये सुधारणा करण्यासाठी आरसीएफद्वारा सीएसआर उपक्रमांअंतर्गत 1 हजा शीतपेट्यांचे वितरण करण्यात आले.
कंपनीलगत असलेल्या शेतकरी प्रशिक्षण केंद्रात शीतपेट्या वाटपाचा सोहळा कार्यकारी संचालक नितिन हिरडे आणि महाव्यवस्थापक संजीव हरळीकर यांच्या प्रमुख उपस्थित झाला. यावेळी उपमहाव्यवस्थापक विनायक पाटील, उपमहाव्यवस्थापक उदय चव्हाण, मुख्य प्रशासकीय व्यवस्थापक महेश पाटील, कॉर्पोरेट सीएसआर सल्लागार धनंजय खामकर, वरिष्ठ व्यवस्थापक सीएसआर हर्षला शिंदे, वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी संतोष वझे, वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी राकेश कवळे यांच्यासह मच्छीमार सोसायट्यांचे पदाधिकारी व लाभार्थी मच्छीमार महिला उपस्थित होते.
सीएसआरच्या माध्यमातून सामाजिक दृष्टीकोन ठेवत समाजाच्या विविध घटकांना मदत करण्यासाठी आरसीएफ सातत्याने प्रयत्नशील आहे. महिला सशक्तीकरणासाठी आणि त्यांना यशस्वी जीवन जगण्यासाठी आरसीएफने आपली भूमिका प्रगल्भपणे पार केली आहे. आपल्याला विश्वास आहे की या शीतपेटीमुळे या महिला मच्छिमारांच्या जीवनात एक महत्त्वपूर्ण बदल घडेल आणि ते अधिक आत्मविश्वासी होऊन आपला व्यवसाय आणि कुटुंब चालवू शकतील.
– नितिन हिरडे, कार्यकारी संचालक (थळ) आरसीफ प्रकल्प