नियम धाब्यावर बसवून उभारण्यात आलेल्या जाहिरात फलकाची पडझड

अवकाळी पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे झाली पडझड
। पनवेल । विशेष प्रतिनिधी ।
सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसामुळे सुटलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे कळंबोली सर्कलवर नियम धब्यावर बसवून उभारण्यात आलेल्या जाहिरात फलकाची पडझड झाल्याचे पाहायला मिळाले आहे. पीडब्ल्यूडी विभागाच्या जागेत परवानगी न घेताच उभारण्यात आलेल्या या फलका खालून विविध कंपन्याच्या गॅस वाहिन्या टाकण्यात आलेल्या असताना गॅस कंपन्याचा ना हरकत परवाना न घेताच हा जाहिरात फलक उभारण्यात आलेला असल्याने पालिकेच्या परवाना विभागाने नुकतीच हा फलक उभारणाऱ्या कंपनीला नोटीस बजावली होती.

मात्र पालिकेच्या नोटीसला केराची टोपली दाखवत महामार्गाच्या अत्यंत कडेला उभारण्यात आलेल्या या जाहिरात फलकाची सोसाट्याच्या वाऱ्यामुळे पडझड झाल्याने भविष्यात या ठिकाणी घटनेची पुनरवृत्ती होऊन एखादा अपघात होण्याची शक्यता आहे.गुरुवारी झालेल्या या घटने नंतर जाहिरात कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी फलकांवरील पडलेला भाग बाजूला हटवण्यासाठी सायन पनवेल महामार्गाची एक लेन वाहतुकी साठी बंद ठेवल्याने या ठिकाणची वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती

Exit mobile version