डॉ.संकेत गायकवाड व ऍड. सुशील गायकवाड यांचा विशेष सत्कार
| पाली | वार्ताहर |
सुधागड तालुक्यातील इयत्ता दहावी, बारावी, पदवीधर, इंजिनिअर या परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम पार पडला. सुधागड तालुका बौद्धजन पंचायत मध्यवर्ती कमिटीच्या वतीने सुप्रीम कमिटी मुंबई चे अध्यक्ष नितीन गायकवाड, मध्यवर्ती कमिटीचे अध्यक्ष भगवान शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा र्कायक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाला सुधागड तालुक्यातून बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी त्यांचा संस्थेच्या वतीने शैक्षणिक साहित्य व गुलाबाचे पुष्प देऊन सन्मान करण्यात आला. याप्रसंगी शेठ जे.एन पालीवाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुधाकर लहुपचां प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित होते. इयत्ता दहावी,बारावी,पदवीधर व इंजिनिअरिंग या परिक्षांमध्ये तालुक्यातून अनेक विद्यार्थ्यांनी चांगले गुण संपादन केल्याने त्यांना सन्मानित करण्यात आले.
यात प्रामुख्याने सुधागड तालुक्यातील नाणोसे गावातील युवक डॉ.संकेत नरेंद्र गायकवाड याने अथक परिश्रम करून बी.ए.एम.एस ही डॉक्टर पदवी संपादन केली तसेच ढोकशेत गावातील युवक ऍड.सुशील सुनील गायकवाड याने एम.कॉम एल.एल.बी विधी शाखेतील पदवी संपादन केली. त्यामुळे या दोन्ही युवकांचे तालुक्याच्या वतीने शाल व पुष्पगुच्छ देऊन विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी प्राचार्य डॉ. सुधाकर लहुपचांग यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. शिक्षणाचे महत्त्व समजावून सांगितले. या कार्यक्रमाला संस्थेचे जेष्ठ पदाधिकारी प्रभाकर गायकवाड, पत्रकार रवींद्रनाथ ओव्हाळ, सुप्रीम कमिटी उपाध्यक्ष मनोहर मोहिते, दिलीप जाधव, महिला अध्यक्षा नूतनताई शिंदे, रिपाइं तालुकाध्यक्ष राहुल सोनावळे, संस्थेचे मा.अध्यक्ष दिपक पवार,रोहिणी जाधव, राजेश गायकवाड, नरेश शिंदे, राजेश जाधव, संतोष जाधव, नितीन जाधव, संजीवनी जाधव, मयुरी मोरे, प्रिया वासनिक, निता कांबळे, चिंतामण पवार, दिलीप मोरे, ऑल इंडिया पँथर सेनेचे जिल्हाध्यक्ष नरेश गायकवाड, राहुल कांबळे, किरण कांबळे, मनीषा कांबळे, कीर्ती कदम, कविता पडवळ, सिध्दांत गायकवाड, दिपक भालेराव आदी पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे सचिव राजेश गायकवाड यांनी केले.