| अलिबाग | प्रतिनिधी |
रायगड मेडिकल असोसिएशन मदरहूड हॉस्पिटल खारघर व प्राथमिक आरोग्य केंद्र पोयनाड यांच्या संयुक्त विद्यमाने स्तन व गर्भाशय मुखाचा कर्करोग यासंदर्भात रविवारी (दि.9) सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते.
या शिबिरामध्ये गर्भाशयाच्या कर्करोगाचे लवकरात लवकर निदान करण्याकरिता आवश्यक असलेली ‘पॅप स्मिअर’ हि चाचणी तसेच, मुली व स्त्रियांमध्ये होणाऱ्या स्तन व गर्भाशयाच्या कर्करोगाविषयी समुपदेशन करण्यात आले. तसेच, उपस्थित मुली व महिला यांची त्याअनुषंगाने आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी आरएमएचे कार्यवाह डा. राजेंद्र चांदोरकर यांनी कार्यक्रमाची रूपरेषा सादर केली. तर, अध्यक्ष डॉ. निशिगंध आठवले यांनी उपस्थित महिलांना आरोग्य मार्गदर्शन केले. या शिबिरात साधारण 77 लाभार्थ्यांनी लाभ घेतला. त्यापैकी 16 महिलांच्या पॅप स्मिअर टेस्ट्स झाल्या. मदरहूड हॉस्पिटल येथील स्त्रीरोगतज्ञ डॉ. श्रुती माने व डॉ. श्रुती उगरण यांनी गर्भशय मुखाचा कर्करोग, स्तनाचा कर्करोग यासंदर्भात आपले विचार मांडले.
पोयनाड प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पद्मश्री अंधेळकर, डॉ. औदुंबर कोळी व डॉ. स्मितल पाटील यांनी समन्वयक म्हणुन हातभार लावला. तर, डॉ. सुनीता पाटील, डॉ. रेखा म्हात्रे, डॉ. ओंकार पाटील यांनी व आरोग्य केंद्रातील पर्यवेक्षकांनी रुग्ण नोंदणीसाठी मदत केली.
कार्यक्रम यशस्वी करण्यात डॉ. मकरंद पाटील, डॉ. युगेश पाटील, डॉ. प्रशांत बैकर, डॉ. भक्ती पाटील यांनी विशेष मेहनत घेतली. पोयनाड प्राथमिक आरोग्य केंद्राचे समुदाय आरोग्य अधिकारी आरोग्य सेवक आरोग्यसेविका गटप्रवर्तक आणि आशा व इतर स्टाफ यांनी विशेष मदत केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरएमएचे कार्यवाह डॉ. राजेंद्र चांदोरकर यांनी केले. उपस्थितांचे आभारप्रदर्शन खजिनदार डॉ. नवलकिशोर साबू यांनी केले.