योग्य त्या मोबदल्याची अपेक्षा
। अलिबाग । प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि सुटलेल्या सोसाट्याच्या वार्यामुळे सर्वांचीच तरांबळ उडाली होती. या पावसात आंबा, काजू बागायतदार यांच्यासह वीटभट्टी व्यावसायिकांचे प्रचंड नंकसान झाले आहे. त्याचबरोबर घरांचे देखील नुकसान झाले असून अनेक संसार उघड्यावर पडले आहेत. त्यामुळे लवकरात लवकर नुकसानीचे पंचनामे पुर्ण करून योग्य तो मोबदला मिळावा, अशी अपेक्षा नुकसानग्रस्तांकडून व्यक्त होत आहे.