। हर्णे । वृत्तसंस्था ।
राज्यस्तरीय लाठीकाठी स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्याचे नेतृत्व करताना दापोलीच्या प्रशिक्षक व विद्यार्थ्यांनी उत्कृष्ठ कामगिरी करून 59 मेडलची कमाई करून दुसर्या क्रमांकाचे जेतेपद मिळवलं. त्यामुळे तालुक्यातून विद्यार्थी व प्रशिक्षकांच कौतुक होत आहे. नुकत्याच 11 व 12 डिसेंबर 2021 रोजी सिंहगड कॉलेज केगाव सोलापूर येथे लाठी असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या वतीने घेण्यात आलेल्या दुसर्या राज्यस्तरीय लाठीकाठी स्पर्धेत दापोलीतून एकूण 29 स्पर्धक सहभागी झाले होते.
सदर स्पर्धेत राज्यातील एकूण 26 जिल्हयातून 497 स्पर्धेक सहभागी झाले होते. या स्पर्धेत एकमलाठी, द्वे लाठी, व काठपवित्रा या प्रकारांमध्ये दापोलीच्या विद्यार्थानी 20 सुवर्णपदक, 13 रौप्यपदक व 26 कास्यपदकांची कमाई करत दुसर्या क्रमांकाचे जेतेपदक पटकावून राज्यात आपली वेगळीच छाप पाडली आहे. तसेच यावेळी दापोली तालुक्यातील प्रशिक्षक राष्ट्रीय पंच परिक्षेत – सुरेंद्र शिंदे, चिन्मय गुरव व स्नेहा भाटकर उत्तीर्ण झाल्याबद्दल त्यांना सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेत 20 विद्यार्थी दापोली शहरातील तर 9 विद्यार्थी हर्णेमधील होते. त्यामुळे वरील सर्व विद्यार्थ्यांचे लाठी असो.ऑफ रत्नागिरीचे उत्तम पाटील यांनी सत्कार केला.