| पनवेल | प्रतिनिधी |
करंजाडे नगरीत इतिहासात पहिल्यांदाच पाच महान संतांच्या पवित्र पादुकांचा दर्शन सोहळा मोठ्या भक्तीमय आणि उत्साहात पार पडला. सेक्टर 4 येथील खुल्या मैदानात आयोजित या सोहळ्याने करंजाडेनगरी खर्या अर्थाने पावन झाली आणि आध्यात्मिक वातावरणात न्हाऊन निघाली.
श्री स्वामी समर्थ नित्य सेवा संस्था करंजाडे यांच्या अथक प्रयत्नांतून हा भव्य सोहळा यशस्वी झाला. या सोहळ्यात श्रीपाद श्रीवल्लभ निर्गुण पादुका, सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज निर्गुण पादुका, सद्गुरू श्री गजानन महाराज पादुका, श्री. शंकर महाराज (धनकवडी) पादुका, सद्गुरू श्री शिवाजी महाराज पादुका आणि राम सेतूमधील पवित्र शिळा यांचे भाविकांना अगदी जवळून दर्शन घेता आले. सकाळपासूनच सोहळ्याला सुरुवात झाली. श्री स्वामी समर्थ नित्य सेवा संस्थेच्या सदस्यांनी विधिवत पादुका पूजन, दत्तायाग आणि पारायण असे धार्मिक विधी भक्तीभावाने संपन्न केले.
यावेळी श्री स्वामी समर्थ नित्य सेवा संस्था, करंजाडेचे अध्यक्ष सुनील जांभळे, सचिव संदीप चव्हाण, खजिनदार रामेश्वरी जांभळे, उपाध्यक्ष प्रिया मालंडकर, उपसचिव राजेश वायंगणकर, उपखजिनदार प्रशांत घाटे, सल्लागार विश्वास चव्हाण, सदस्य सचिन काटकर, विनायक मढवी तसेच संस्थेचे इतर सदस्य व सेवेकरी उपस्थित होते.