सुधागडच्या कन्येची ॲथलेटिक्समध्ये चंदेरी कामगिरी

रामवाडीच्या ऋतुजा पातेरेचे राज्यस्तरीय स्पर्धेत रौप्यपदक

| पाली/बेणसे | प्रतिनिधी |

मुळची सुधागड तालुक्यातील रामवाडी गावची आणि ठाण्यातील संभाजीनगर भागात राहणारी ऋतुजा राजू पातेरे या ॲथलेटिक्सपटुने नाशिक येथे 2 व 3 मे 2026 रोजी संपन्न झालेल्या राज्यस्तरीय ऍथलेटिक्स स्पर्धेत 200,400 आणि 800 मीटर धावणे क्रिडा स्पर्धेत ठाणे जिल्ह्यातील ऋतुजा राजु पातेरे हिने रौप्यपदके पटकावली. ऋतुजा पातेरे हिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

नाशिक येथे 2 व 3मे, 2026 रोजी संपन्न झालेल्या राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेत अनुक्रमे 200, 400 आणि 800 मीटर धावणे क्रीडा स्पर्धेत ठाणे जिल्ह्यातील ऋतुजा राजु पातेरे हिने रौप्यपदके पटकावली. मागील 10 वर्षे केलेल्या मेहनतीचे रुपांतर या राज्यस्तरीय रौप्य पदकात झाल्याचे ऋतुजा नमूद करते. प्रतिवर्षी विविध संस्थांच्या माध्यमातून आयोजित करण्यात येत असलेल्या ठाणे, मुंबई, रायगड जिल्ह्यातील मॅरेथॉन स्पर्धांमध्ये सहभागी होत त्यातून मिळालेल्या अनुभवातून ठाणे जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करीत बुलढाणा येथे संपन्न झालेल्या क्रॉस कंट्री 10 किमी स्पर्धा प्रकारात विजेतेपद (चॅम्पियनशिप) नोंदवले आहे. भविष्यात विजयाची अनेक शिखरे गाठण्यासाठी अधिक परिश्रम घेण्याची मानसिक व शारीरिक तयारी असल्याचे ऋतुजा ने सांगितले. या धवल यशाचे श्रेय तीने तीचे सिनीयर कोच दत्ता चव्हाण आणि ट्रक ॲन्ड फिल्ड मार्शल स्वप्नील चव्हाण यांना दिलेे आणि तेच आपले ऊर्जा व प्रेरणास्थान असल्याचे ऋतुजा राजू पातेरे हिने बोलताना सांगितले.

Exit mobile version