| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
सुधागड तालुका रहिवाशांच्या सेवेसाठी सातत्याने झटणाऱ्या सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ ठाणे या संस्थेतर्फे सौंदर्य स्पर्धेत देदीप्यमान यश संपादन केलेल्या नीलम श्याम पवार हिचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह आणि बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला.
सुधागड तालुक्यातील वऱ्हाड जांभुळपाडा येथील नीलम पवार हिने वाशी मुंबई येथील मेसमेरिक मिस इंडिया पेगिएन्ट 2024 या स्पर्धेत यश संपादन केले. या स्पर्धेत पवार हिने 18 ते 30 कुमारी वयोगटात उत्कृष्ट सादरीकरण करीत फस्ट रर्नर अपचा मानाचा किताब जिंकत सुधागड व रायगड जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला. तिच्या या यशाबद्दल सुधागड तालुका रहिवासी सेवा संघातर्फे आयोजित स्नेहमेळाव्यात सन्मान आणि सत्कार करण्यात आला.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष विठ्ठल घाडगे, उपाध्यक्ष शंकर काळभोर, कार्याध्यक्ष प्रकाश शिलकर, सल्लागार सुरेश शिंदे, रमेश सागळे, शिवाजी दळवी, जनार्दन घोंगे, गणपत डिगे, सरचिटणीस राजू पातेरे, खजिनदार विजय पवार, उपखजिनदार विजय जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.