। नवीन पनवेल । वार्ताहर ।
कामोठे नोडचे कार्यकारी अभियंता यांची भेट घेऊन कामोठेतील समस्या सोडविण्याची मागणी संतोष चिखलकर उपाध्यक्ष-पनवेल जिल्हा काँग्रेस कमीटी यांच्यातर्फे करण्यात आली आहे.
सेक्टर 6 ते 10 मधील वाहणार्या गटारांची त्वरित कारवाई करण्यासोबत नवीन गटार लाईन टाकण्याचा प्रस्ताव पास करणे, सेक्टर 18 मधील सिडकोचा राखीव प्लॉट आहे त्याची साफसफाई करून नागरिकांना मॉर्निंग वॉल्क तसेच इतर शारिरिक व्यायामासाठी उपलब्ध करून देणे, सेक्टर 36 मधील प्लॉट्स क्रमांक 41, 42, सत्यकुंज सोसायटी समोरील पुथपाथ खालील गटार लाईन दुरुस्थ करण्याबाबत गेली 2 वर्ष सोसायच्या वतीने पाठपुरावा करण्यात येत आहे त्याबाबतीत लक्ष देऊन काम त्वरित सुरु करणे, कामोठे नोड मधील डांबरीकरणाचे काम जोरात सुरु आहे तेव्हा प्रत्येक सेक्टर मधील प्रत्येक प्लॉट्स समोरील डांबरीकरण झालेच पाहिजे या कामोठे शहरातील समस्यांबाबत रीतसर चर्चा करण्यात करून त्याबाबत लवकरात लवकर उपायोजना करण्याची विनंती करण्यात आली. यावेळी कामोठे शहरातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील पोपट आवारी, रवींद्र जाधव, प्रमोद पेंडुरकर, काकासाहेब पवार मान्यवर उपस्थित होते.