| रायगड | प्रतिनिधी |
गेल्या काही महिन्यांपासून रिक्त असलेल्या राज्य निवडणूक आयुक्तपदी दिनेश वाघमारे याची नियुक्ती करण्यात आली आहे. 20 जानेवारीपासून अथवा ते ज्या दिवशी कार्यालयात पदाचा कार्यभार स्वीकारातील त्या तारखेपासून पुढील पाच वर्ष त्यांच्यावर सदरची जबाबदारी राहणार आहे. राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने हे आदेश दिले आहेत.
राज्य निवडणूक आयुक्तपदासाठी माजी मुख्य सचिव नितीन करीर, नियोजन विभागाचे अप्पर मुख्य सचिव राजगोपाल देवरा यांच्यासह दिनेश वाघमारे, राजीव जलोटा यांची नावे चर्चेत होती. राज्यातील 29 महापालिका, 27 जिल्हा परिषदांसह विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन ते चार वर्षांपासून प्रलंबित आहेत. या निवडणुका येत्या एप्रिल महिन्यात घेण्याचे नियोजन आहे. त्यामुळे यू.पी.एस. मदान हे सप्टेंबरमध्ये निवृत्त झाल्यापासून राज्य निवडणूक आयुक्तपद रिक्त होते.