| रसायनी | वार्ताहर |
मोहोपाडा येथील तीन आसनी रिक्षा थांब्यावर रिक्षात प्रवासी घेण्यावरून वाद होऊन मारहाणीची घटना घडली आहे. याबाबत रसायनी पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, मोहोपाडा येथे तक्रारदार महादेव गणू कर्णेकर (52), रा. सावळे, व्यवसाय-रिक्षाचालक मोहोपाडा तीन आसनी रिक्षा स्टॅन्ड जवळ रिक्षात वाहतुकीसाठी रिलायन्स कंपनीकडे जाणारे पॅसेंजर का भरले या कारणावरून गैरसमज करून संदीप शिंदे, दर्शन गायकर, जाधव या तिघांनी महादेव कर्णेकर यांना शिविगाळ करून धक्काबुक्की केली तसेच आरोपी यांनी तक्रारदार यांचे डोक्यात लाकडी दांडका मारून दुखापत केली. याबाबत रसायनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, रसायनी पोलीस ठाण्याचे सपोनि प्रमोद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तपासिक अंमलदार मपोना के. के. पाटील अधिक तपास करीत आहेत.