| रत्नागिरी | वृत्तसंस्था |
मागील आठवडाभर वातावरणाने साथ दिल्यामुळे मच्छीमारांना चांगल्या प्रमाणात मच्छी मिळाल्यामुळे मच्छीमार सुखावले होते. परंतु, गेले दोन दिवस किनारी भागात वातावरणात बदल झाल्याने समुद्र खवळला असल्यामुळे गिलनेट मासेमारी ठप्प झाली आहे.
हवामान विभागाने जिल्ह्यासाठी यलो अलर्ट दिला आहे. येत्या दोन दिवसांत जोरदार पावसाची शक्यताही वर्तवली आहे. काल रत्नागिरी जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. पश्चिम बंगालमध्ये वादळाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. बदलत्या वातावरणामुळे मच्छीमारीवर झालेला आहे. गिलनेटद्वारे मासेमारी करणारे मच्छीमार सुरक्षे कारणास्तव बंदरातच आहेत. त्याचबरोबर ट्रॉलिंगसह मासेमारी करणारे काही मच्छिमार समुद्रात धोका पत्करून मासेमारीसाठी गेले होते. पण त्यांच्या हाती काही लागले नाही.