| रसायनी | वार्ताहर |
अज्ञानाच्या अंधाराला छेदून शिक्षणाचा प्रकाश पसरवून विद्यार्थ्यांच्या मनात ज्ञानाची ओढ निर्माण करणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे भावी खासदार माधवी जोशी. तळागळातील शिक्षणापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्याना मदतीचा हात देऊन पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे अविरत कार्य माधवीताईंनी सुरू केले आहे. त्यांच्या हस्ते खालापूर, कर्जत तालुक्यातील शाळांत शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपाचे कार्यक्रम सुरू आहेत.
यातच खरीवली, गोहे, गोठीवली, चिलठन, कलंब, मालवाडी या शाळांमध्ये 1500 विद्यार्थ्यांना बॅग वाटप करण्यात आले. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना कोणत्याही शैक्षणिक अडचणी आल्या तर त्वरित माधवीताई युवा प्रतिष्ठानकडे संपर्क साधा आम्ही सदैव तुमच्यासोबत असू, असा दृढ विश्वास विद्यार्थ्यांना देण्यात आला. त्यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचे ते हसू आणि उत्साह पाहून माधवीताईंनी थेट विद्यार्थी आणि पालकांशी हितगुज साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. या कार्यक्रमात विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.