एक हजार विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

oplus_2

। खांब । वार्ताहर ।

साई फाऊंडेशन चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई व नाईटिंगल चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई यांच्यावतीने रोहा तालुक्यातील विविध माध्यमिक व प्राथमिक शाळेतील सुमारे एक हजार विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला.

गेल्या दहा वर्षांची यशस्वी परंपरा राखत याही वर्षी साई फाऊंडेशन चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई व नाईटिंगल चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई यांच्यावतीने स्व.शिवरामकृष्णन आयर यांच्या स्मरणार्थ व डॉ.असिफ कासकर यांच्या विशेष प्रयत्नांतून तालुक्यातील खांब, चिल्हे, विठ्ठलवाडी, तळाघर येथील माध्यमिक विद्यालय व तळवली, नडवली, चिल्हे, धानकान्हे, देवकान्हे, उडदवणे, मुठवली खु. गावठाण, तारेघर, खारी, देवकान्हे डोंगर वाडी आदी प्राथमिक शाळेतील सुमारे एक हजार विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे व खाऊचे वाटप करण्यात आले. यावेळी डॉ. असिफ कासकर, डॉ. गौतम त्रेहन, अमित चौधरी, संदीप विचारे, कविता पाटील, अश्‍विनी विचारे, संदेश गमरे, विनोद पाटील, तौसिफ येरूणकर आदी मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version