माणगावात विद्यार्थ्यांना खाऊ वाटप

सामाजिक कार्यकर्ते अंकुश उंडरे व मंगेश सावंत यांचा उपक्रम
। माणगाव । वार्ताहर ।
माणगाव तालुक्यातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांना सामाजिक कार्यकर्ते अंकुश नारायण उंडरे व भागाड ग्रामपंचायतीचे सदस्य मंगेश महीपत सावंत यांच्यातर्फे सामाजिक बांधिलकीचा एक भाग म्हणून देण्यात आलेल्या खाऊचे वाटप सोमवारी (दि.25) करण्यात आले.
तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद शाळा शिरवली आदिवासी वाडी, देगाव शाळा, देगाव आदिवासी वाडी, रातवड हायस्कूल येथे सामाजिक कार्यकर्ते अंकुश नारायण उंडरे व भागाड ग्रामपंचायतीचे सदस्य मंगेश महीपत सावंत यांच्यातर्फे देण्यात आलेल्या खाऊचे वाटप पदवीधर शिक्षक तथा आविष्कार फाऊंडेशन इंडिया रायगड जिल्हा कार्याध्यक्ष शंकर दत्ताराम शिंदे, दहिवली शाळेचे पदवीधर शिक्षक संजय पाटील, शिरवली आदिवासी वाडी शाळेचे मुख्याध्यापक संजय पाटोळे रयतेचा कैवारीचे माणगाव तालुका प्रतिनिधी कैलास महाजन आदींच्या हस्ते करण्यात आले.

Exit mobile version